सुयश ऑटो सेवक पतसंस्था सभा संपन्न. आठ टक्के लाभांश जाहीर.
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :-
प्रत्येक सभासदाला पाच लाखापर्यंत कर्ज मर्यादा, आपत्कालीन परिस्थितीमध्ये ५० हजार तातडीची कर्ज योजना, प्रत्येक सभासदाचा विमा उतरवण्यात आलेला आहे व सभासदांच्या पाल्यासाठी सहकार्य , व या आर्थिक वर्षात ८% लाभांश देण्यात येणार आहे व सभासदांच्या हितासाठी नेहमी कटिबद्ध राहू अशी ग्वाही सुयश ऑटो पतसंस्थेचे चेअरमन श्री.भारत नाना जाधव यांनी दिली.
सुयश ऑटो सेवकांच्या पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी भारत जाधव उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करत होते या प्रसंगी सुयश ऑटो कंपनीचे प्रकल्प प्रमुख मनोज इंगळे, उपमहाव्यवस्थापक महेंद्र निगडे,वरिष्ठ अभियंता शीरीष राऊत, संस्थेचे उपाध्यक्ष पोपटराव घुले, सचिव नंदकुमार गवारे,संचालक – अण्णा निकम,संजय पवार,राजेंद्र खरात,लाला भोंग,संजय कांबळे,विनोद ठोंबरे,दिनेश देशमुख,धर्मेंद्र घोडके व सर्व सभासद कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सभासदांच्या पाल्यांचा १० वी उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यामध्ये अभिषेक नंदकुमार घुले, मुस्कान सलीम शेख ,वैष्णवी अशोक भोंग, आकाश सचिन भालेराव, अमृता अनिल गोफने, श्रेयश श्रीरीष राऊत आदींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
अहवाल वाचन सचिव नंदकुमार गवारे यांनी केले.मनोगत धर्मेंद्र घोडके सोमनाथ माने यांनी व्यक्त केले. तर सूत्रसंचालन दिनेश देशमुख यांनी केले. आभार पोपटराव घुले यांनी मानले