दुधेबावी येथे उद्यानकन्यांचे चे स्वागत करताना सरपंच सौ. भावना सोनवलकर, कृषि सहायक सागर पवार, तलाठी राहुल इंगळे व ग्रामस्थ
फलटण टुडे वृत्तसेवा ( दुधेबावी दि. १८ ) :-
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथील सातव्या सत्रातील उद्यानकन्या प्रशिक्षणासाठी दुधेबावी ता. फलटण जि. सातारा येथे दाखल झाल्या असुन दुधेबावी ग्रामपंचायत येथे सरपंच, उपसरपंच, कृषि सहायक, तलाठी, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी या उद्यानकन्या विद्यार्थिनींचे उत्स्फुर्त स्वागत केले.
ग्रामीण उद्यानविदया कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सुमारे २० आठवडे येथे वास्तव्यास राहणार असलेल्या या विद्यार्थीनी शेतकऱ्यांना शेतिविषयक माहिती, नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती देऊन गावामध्ये शेतिविषयक विविध उपक्रम व कार्यक्रम राबविणार आहेत. माती परीक्षण, फळबाग लागवड, एकात्मिक कीड रोग, बीज प्रक्रिया, आधुनिक शेती औजारांचे वापर, शेतीचा आर्थिक फायदा, जनावरांचे लसीकरण, आदीबाबत उपस्थित गावकरी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे या उद्यानकन्यांनी सांगितले. उद्यानविद्या विषयक जनजागृती करण्यास उद्यानविदया कार्यानुभव यांचा अभ्यास उद्यानकन्या करणार आहेत. पल्लवी श्रीखंडे, तृप्ती नाळे, वाघमारे संध्या, शर्वरी मतकर, सय्यद आयेशा, जाधव साक्षी व काजल पिसाळ या उद्यानकन्या येथे दाखल झाल्या आहेत. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सरपंच मा. सौ. भावना सोनवलकर, कृषि सहायक सागर पवार, तलाठी राहुल इंगळे व सर्व ग्रामस्थ यांनी यावेळी दिले.
उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा. जे व्ही. लेंभे व प्रा. ए. डी. पाटील यांचे मार्गदर्शन या विद्यार्थिनींना लाभणार आहे.
Post Views: 54