फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :-
महाराष्ट्र शासन कृषि विभाग आणि तालुका कृषि अधिकारी बारामती सौ.सुप्रिया बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 17.06.2024 रोजी मौजे जैनकवाडी येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषि संजीवनी पंधरवडा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय जैनकवाडी येथे आयोजित करण्यात आला.
मंडळ कृषि अधिकारी उंडवडी सुपे श्री वाघमारे साहेब यांनी कृषि संजीवनी पंधरवडा मोहीम कार्यक्रम बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच त्यांच्या उपस्थितीत सूर्यफुल प्रकल्प बियाणे शेतकरी यांना वाटप करण्यात आले.
कृषि पर्यवेक्षक श्री.घोळवे ए.बी.यांनी बीजप्रक्रियेचे महत्व,फायदे याविषयी माहिती दिली.बीजप्रक्रिया करताना अगोदर बुरशीनाशक,कीटकनाशक आणि सर्वात शेवटी जिवाणू संवर्धक याची बीजप्रक्रिया करूनच बीबीएफ पेरणी यंत्राने पेरणी करावी असे अवाहन केले. सूर्यफुल बियाणे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक उपस्थित शेतकरी यांना करून दाखवून सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच महाडीबीटी योजना,महात्मा गांधी रोजगार हमी योजना,भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, फळपीक विमा योजना अश्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आयोजन कृषि सहाय्यक श्री.मदने एस.टी.यांनी केले.
यावेळी कृषि सहाय्यक श्री गोफणे एम.एस. कृषि मित्र श्री महादेव शेंडे,अभिजित पवार,अरविंद पवार यांचेसह अनेक शेतकरी उपस्थित होते..