फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :-
ओडिसा येथे झालेल्या किट युनिव्हरसिटी
मध्ये झालेल्या राष्ट्रीय पेंच्याक सिलट स्पर्धेत बारामतीच्या अमृत मलगुंडे आणि आदित्य आटोळे यांचे महाराष्ट्र टीम मध्ये निवड झाली . त्यांनी काही दिवस मुंबई या ठिकाणी प्रॅक्टिस करून ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेत भारतामधील एकूण 1200 खेळाडूंनी सहभाग नोंदवला यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 35 खेळाडू सहभागी झाले होते. अमृत व आदित्य यांनी गंडा (डेमो फाईट) या इव्हेन्ट मध्ये सहभाग नोंदवून महाराष्ट्र राज्याला गोल्ड मेडल मिळवून दिले. . अमृत आणि आदित्य या दोघांचे ही आई – वडील शेतकरी असुन या दोन्ही खेळाडूंनी योद्धा स्पोर्ट्स क्लब अकॅडमी बारामती या ठिकाणी 10 वर्ष प्रॅक्टिस केली आहे. याचेच फळ या दोन्ही खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल फळ रुपी मिळाले अशी माहिती योद्धा स्पोर्ट्स क्लब चे सर्वेसर्वा साहेबराव ओहोळ यांनी दिली. हें दोन्ही खेळाडू येणाऱ्या 38 व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी करत आहेत. यांना इंडियन पिंच्याक सिलट चे अध्यक्ष श्री. किशोर येवले व सेक्रेटरी इकबाल यांनी मेडल देऊन सन्मानित केले.
हा खेळ युनिव्हरसिटी गेम, ऑल इंडिया पोलीस गेम, एशियन बीच गेम्स, अश्या ऑफिसयल स्पर्धेत खेळाला जातो. या खेळाला केंद्रीय नोकरी मध्ये 5% आरक्षण देखील आहे.अमृत आणि आदित्य यांना या मेडल मुळे केंद्रात नोकरीची संधी उपलब्ध असल्याचे साहेबराव ओव्हाळ यांनी सांगितले.