*श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे उद्यानदुत शेरचिवाडी येथे दाखल*

फलटण टुडे वृत्तसेवा :-

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील उद्यानदुत प्रशिक्षणासाठी शेरेचिवाडी ता. फलटण जि. सातारा येथे दाखल झाले असुन शेरेचिवडी ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच व ग्रामस्थांनी या उद्यानदुत विद्यार्थाचे उत्स्फुर्त स्वागत केले.
ग्रामीण उद्यानविदया कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सुमारे २० आठवडे येथे वास्तव्यास राहणार असलेले हे विद्यार्थी शेतकऱ्यांना शेतिविषयक माहिती, नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती देऊन गावामध्ये शेतिविषयक विविध उपक्रम व कार्यक्रम राबविणार आहेत. माती परीक्षण, फळबाग लागवड, एकात्मिक कीड रोग, बीज प्रक्रिया, आधुनिक शेती औजारे वापर शेतीचा आर्थिक फायदा, जनावरांचे लसीकरण आदीबाबत उपस्थित गावकरी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे या उद्यान दूतांनी सांगितले. उद्यानविद्या विषयक जनजागृती करण्यास उद्यानविदया कार्यानुभव यांचा अभ्यास उदयानदुत करणार आहेत. राऊत अभिजित, ननवरे ओमकार, माडकर प्रणव, कदम अभिषेक, नाईक निंबाळकर केदार , भिसे दिगंबर, भांडवलकर रोहित हे उद्यानदूत येथे दाखल झाले आहेत. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सरपंच दुर्गादेवी रविंद्र नलवडे , उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ यांनी यावेळी दिले. मंडळ कृषी अधिकारी सतीश निंबाळकर, सहाय्यक कृषि अधिकारी राहूल कांबळे योगेश भोंगळे यावेळी उपस्थीत होते.
उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा जे व्ही. लेंभे व प्रा. ए. डी. पाटील यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभणार आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!