होलार समाज्याच्या वतीने राष्ट्रवादी चा वर्धापन दिन साजरा

किनारा वृद्धाश्रम मध्ये राष्ट्रवादी वर्धापन दिन साजरा करताना होलार समाज्याचे पदाधिकारी

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :-
राष्ट्रीय होलार समाज सेवा संघ बारामती शाखा यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) २५ वा वर्धापन दिन ‘ किनारा वृद्धाश्रम व मतिमंद सेवा ट्रस्ट , अहिरवडे ,कामशेत पुणे जिल्हा येथील वृद्धांना जीवनावश्यक वस्तू ,किराणा साहित्य देऊन व फळे वाटप करून साजरा करण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रीय होलार समाज संघ यांचे राष्ट्रीय नेते माणिकराव भडंगे, राज्य अध्यक्ष उत्तम हातेकर डॉ. विशाल भडंगे व बारामती शहर अध्यक्ष गोरख भाऊ पारसे, तालुका अध्यक्ष सुरज देवकाते ,राष्ट्रवादी बारामती शहर युवक उपाध्यक्ष विजय आहीवळे आणि अक्षय मोरे, संतोष जाधव, शेखर अहिवळे व बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लक्ष्मण मोरे व किनारा वृद्धाश्रम व मतिमंद सेवा ट्रस्टच्या संचालिका प्रीती वैद्य व आरोग्य अधिकारी डॉ वैष्णवी दाते आदी मान्यवर उपस्तीत होते.
६० वर्षाच्या पुढील अनाथ व मतिमंद वृद्धांची सेवा करणे म्हणजे खरी ईशवर सेवा असून अत्याधुनिक क्षेत्रात सेवेची खरी गरज असल्याचे बारामती शहर अध्यक्ष गोरख भाऊ पारसे यांनी सांगितले.
 आभार सूरज देवकाते यांनी मानले .

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!