फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये जळोची ता.बारामती या परिसरात राहणाऱ्या चि.मयूर मच्छिंद्र शेंडगे यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. चि.मयूर मच्छिंद्र शेंडगे याने नीट परीक्षेत 720 पैकी 649 असे गुण मिळवले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना मयूर ने मिळवलेल्या यशाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.तसेच जळोची गावातील रा.काँ.पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पागळे, व माणिकराव मलगुंडे यांच्या हस्ते त्याचा गुणगौरव करण्यात आला.
या प्रसंगी धनंजय जमदाडे,शेखर सातकर,किशोर शेंडगे,योगेश मलगुंडे,दादासाहेब धागडे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते..