फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने मराठा विद्यार्थी,उद्योजक व उद्योग ,व्यवसाय सुरू करू इच्छित, त्याच प्रमाणे परदेशी शिक्षण घेऊ इच्छित व विविध शिष्यवृत्ती योजना, रोजगार निर्मिती कार्यक्रम,विविध प्रमाणपत्र कशी मिळवायची , आशा सर्वांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना,विवाह समारंभ, इलक्ट्रोनिक,पर्यटन, लाईफ स्टाईल, घर, बंगला आदी सर्व माहिती कमी वेळेत,एकाच पुस्तकात उपलब्ध होणे साठी ‘पुढच पाऊल’ मराठ्या साठी दिनदर्शिका हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
याचा प्रकाशन सोहळा शनिवार दि.०८ जून २०२४ रोजी अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती तालुका शाखा च्या पदाधिकारी च्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. या प्रसंगी
अध्यक्ष संभाजी माने व सागर खलाटे, गणेश काळे, हनुमंत भापकर, सुदर्शन निचळ, कुमार चव्हाण, विलास शेळके, महेश निगडे, अभिजीत जगताप, अनिल सावळेपाटील, सौ
अर्चना सातव,सौ ज्योती जाधव, ऍड सौ सुप्रिया बर्गे ,सौ मनीषा शिंदे,ऍड सौ अश्विनी शिंदे व इतर मान्यवर उपस्तीत होते.
मराठा समाज्यातील विध्यार्थी आणि व्यवसाय करू इच्छित असणाऱ्या तरुण तरुणी साठी सदर पुस्तक अतिशय उपयुक्त असून घर बसल्या सर्व माहिती एकाच पुस्तकात आहे या मुळे वेळ व पैसा वाचणार आहे. पाहिजे त्यास पुस्तक उपलब्ध या संकल्पने नुसार सदर पुस्तक मिळणार आहे तरी खरेदी करू इच्छुकांनी संभाजी माने 9822449306,कुमार चव्हाण 7066069009 सौ. अर्चना सातव 7875121989 यांच्याशी संपर्क साधावा असे अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती शाखा च्या वतीने सदर माहिती देण्यात आली आहे.