फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी ) :-
दि. ३१ मे रोजी मौजे जैनकवाडी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने खरीप हंगाम मोहीम अंतर्गत तुर ,बाजरी बियाणे उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक,दशपर्णी अर्क बनवणे, हुमनी नियंत्रण प्रकाश सापळे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.
त्यावेळी तालुका कृषी अधिकारी बारामती सौ.सुप्रिया बांदल यांनी उपस्थित शेतकऱ्यांना खरीप हंगाम पूर्वतयारी तसेच कृषि विभागाच्या विविध योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कृषी पर्यवेक्षक श्री.ए.बी. घोळवे यांनी बीजप्रक्रिया करूनच बी.बी.एफ.यंत्राद्वारे पेरणी करण्याचे आवाहन करून कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.