फलटण, दि. 29 : –
मालोजीनगर, कोळकी ता. फलटण येथील रहिवासी असणारे अमित अशोक पंडित (वय : 36) यांचे आज आकस्मित निधन झाले आहे. त्यांच्या पच्छात आई, वडील, भाऊ, भावजय, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
कोळकी येथील रहिवासी असणारे अमित पंडित हे अत्यंत मनमेळावु स्वभावाचे होते. मालोजीनगर येथील सामाजिक कार्यामध्ये ते नेहमी अग्रेसर होते. त्यांच्या जाण्याने कोळकीच्या मालोजीनगर परिसरात एक पोकळी निर्माण झाली आहे.