नांदल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने एस. एस. सी. परीक्षा मार्च २०२४ चा निकाल जाहिर केला. या परिक्षेत फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीसंत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय नांदलचा निकाल १००% लागला असून सलग पाच वर्षे निकालाची परंपरा कायम राखली आहे. या विद्यालयातील कु. राजश्री आबा को करे दिने ९४.४०% गुण मिळवून आदर्की केंद्रात दुसरा क्रमांक पटकवला, कु. दिव्या सुरेश कोळेकर हिने ९३.४०% गुण मिळवून प्रशालेत द्वितीय क्रमांक तर कु. अनुष्का महेंद्र कोळेकर व कु. आरती उत्तमराव सरक यांनी ९१.४०% गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक पटकवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे- फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सचिव मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर शाळा समितीचे चेअरमन मा. श्री. विश्वजीत राजे नाईक निंबाळकर प्रशासन अधिकारी मा. श्री. अरविंद निकम, तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी स्कूल कमिटी सदस्य मुख्याध्यापक श्री. रमेश जगताप. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पाठक, ग्रामस या सर्वांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.