सुपा , ता . बारामती येथील रहिवासी, आणि बारामती सायकल क्लबचे सदस्य तसेच सर्पमित्र श्री.विलास विठ्ठल वाघचौरे. रा सुपे ता बारामती जि पुणे. यांना समाजसेवेची आवड आहे त्या बरोबर पर्यावरण व सर्पा विषयी जनजागृती संपुर्ण भारतभर करण्याचा मानस आहे.
२०२२ साली मोटारसायकल वर ५८०० किलोमीटर चा प्रवास करत *’पर्यावरण बचाव बेटी बचाव बेटी पढाव’* चा संदेश देत पूर्ण केला .
तसेच २०२३ साली सायकल वर ५६०० किलोमीटर अंतर देखील सामाजिक संदेश देत पूर्ण केलं होतं .
तर २०२४ मध्ये ,१८ फेब्रुवारी २०२४ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी बारामती येथे बारामती सायकल क्लब सदस्यांच्या उपस्थितीत सिद्धी गणेश मंदिरापासून भिगवण चौक , बारामती येथून पायी प्रवासाला सुरवात करून तब्बल १८०० किलोमीटर ची पदयात्रा ९० दिवसात केदारनाथ ला पोहचून पूर्ण केला आणि आज त्या प्रवासाची समाप्ती त्यांनी बारामती भिगवण चौक येथील सिधी गणेश मंदिर येथेच केली..
तसेच विलास यांना सामाजिक कामाची आवड असल्याने, त्यांनी सुपा भागात विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात अनेक निराधार लोकांना ग्रामपंचाय सदस्य या नात्याने सुविधा पुरवण्याचे काम करत असतो. पावसाळ्यात सापांच बाहेर पडण्याच प्रमाण जास्त असते, सुपा भागात प्रामुख्याने विषारी सर्प आढळतात. आशा परिस्थिती मध्ये शेतकरी बांधव शेतात गोठ्यात घराच्या आसपास सर्प दंश होण्याची शक्यता असते . बऱ्याच जणांना सर्पदंश झालेला ही आहे अशा परिस्थिती मध्ये काही लोक साप चावल्या नंतर त्यांचे समुपदेशन करून त्यांना लवकरात लवकर उपचार द्यायचा प्रयत्न करतात, अनेकदा रुग्णांची ची परिस्थिती नसते. उपचार घेण्यासाठी त्यांना ससून चं नाव सुचवलं जातं. कधी ब्लड लागतं. तर अशा वेळी शक्य ते प्रयत्न वाघचौरे करतात…
मागील वर्षी वाघचौरे यांनी बारामती सायकल क्लब च्या वतीने ने १० राज्य व एक देश नेपाळ असे ५६०० किलोमीटर अंतर पुर्ण करून आलेले आहेत, या संपूर्ण सायकल प्रवासात त्यांनी नशा मुक्ती हा संदेश देत संपूर्ण प्रवास करत ८४ दिवसांमध्ये पुर्ण केला..
बारामती ते केदारनाथ पायी प्रवास करत असताना अनेक लोकांना व्यसनापासून दूर रहावे..निसर्ग संगोपन करावे, शिक्षणाला महत्त्व द्यावे आणि सायकल चालवण्याचे फायदे, यावरती मागदर्शन करत व विविध भागात जनजागृती करत प्रवास पुर्ण केलेला आहे, या प्रवासामध्ये त्यांना भारत देश जवळून समजण्याचा अनुभव देखील आला,
.इंस्टाग्राम च्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकांनी भरभरून प्रेम दिले..त्यांनी हा संपूर्ण प्रवास हा त्यांच्या इंस्टाग्राम आयडी Vilas snake या वरती पाहू शकतात. या प्रवासादरम्यान बारामती सायकल क्लबचे सदस्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य केले, तसेच सुपे गावातील लोकांनी खूप सहकार्य केले…
खरतर, पायी प्रवासामध्ये खूप काही शिकायला मिळालं…लवकरच विलास वाघचौरे माऊंट एव्हरेस्ट व किलीमांजरो सर करायचा प्रयत्न करणार आहेत, आणि त्या लसाठी त्यांना सहकार्य लागेल, अशी इच्छा प्रदर्शित केली