फलटण टुडे वृत्तसेवा दि ६:-
४३ माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सुविद्य पत्नी व सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ.शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांनी फलटण शहरासह ग्रामीण भागात महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ अनेक मतदार व मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या.यावेळी सौ.शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले फलटण शहरासह ग्रामीण भागात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यांना फलटण मधून जास्तीचे लीड मिळेल यात तीळ मात्र शंका नाही.भविष्यात
फलटणसह माढा मतदारसंघातील विकास कामांसाठी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्य देऊन धैर्यशील मोहिते पाटलांना विजय करण्याची विनंती अनेक मतदार व मान्यवरांना केली.