फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) : –
बारामती शहरातील रुई येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेला मंगळवार दि.३० एप्रिल रोजी प्रारंभ होत आहे.
यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महादेव चौधर यांनी दिली.
श्री भैरवनाथ यात्रेच्या पहिल्या दिवशी भैरवनाथ देवाचा कार्यक्रम होणार सायंकाळी ५ च्या दरम्यान देवाचे प्रस्थान होणार आहे यानंतर देव देवळात येणार आहे. देऊळ वाड्यातील स्वागत प्रमाणे मंदिर परिसरातील बांधकाम, विद्युत रोषणाई, तसेच फुल झाडांची सजावट यंदाच्या यात्राचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे .आकाशाला गवसणी घालणाऱ्या मानाच्या कावडी व देवाच्या पालखीचे देखणे रूप भाविकांना अनुभवता येणार आहे.
बुधवार १ मे रोजी सकाळी आठ वाजता रुई गावातून पालखी मिरवणूक, दंडवत नैवेद्य व घोटा कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळी सात वाजता देवाचा लग्न सोहळा देवाला बाशिंग व लग्नाचा पोषक चढवून मानकरी सालकरी धामण पुजारी वासंखे मांडवाच्या साक्षीनं ग्रामदैवत श्री भैरवनाथ व जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा सायंकाळी शाही थाटात होणार आहे.
रात्री आठ वाजता छबिना रंगणार आहे , काठी पालखी मिरवणूक व शोभेचे चे दारूकाम होणार आहे.
रात्रौ ९ वाजता ग्रामस्थांच्या मनोरंजन साठी हनुमंतराव देवकाते पाटील प्रस्तुत लोकनाट्य तमाशा चे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार २ मे रोजी सकाळी ११ ते ३ हजेरी कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा आणि सांयकाळी कुस्त्याचे भव्य मैदान होणार आहे यामुळे कुस्त्यांसाठी राज्यातील नामांकित पैलवान रुईमध्ये उपस्थित राहणार आहे व जिकणाऱ्या कुस्ती मल्लांचा व व प्रथमच कुस्ती क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार समारंभाचे सुद्धा आयोजन केले आहे तरी बारामती सह राज्यातील सर्व भैरवनाथ भाविकांनी उपस्तीत राहण्याचे आवाहन भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे खजिनदार पोपटराव साळुंके यांनी केले आहे.