फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती ): –
बारामती परिमंडळा अंतर्गत मोरगाव शाखा कार्यालयांतर्गत स्व. रिंकू बनसोडे, वरिष्ठ तंत्रज्ञ, (३४ वर्ष) यांच्यावर ग्राहकांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला त्या अनुषंगाने बारामती परिमंडळ ऊर्जा भवन, बारामती येथे संयुक्त कृती समितीच्या वतीने शोकसभा घेऊन जाहीर निषेध नोंदवून त्यांच्या मारेकऱ्यास कडक शिक्षा व्हावी व रिंकू बनसोडे यांना न्याय मिळावा अशी मागणी महावितरण कर्मचारी कृती समिती यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी कृती समितीच्या वतीने सुरेश देवकर, विलास चौधर, गणेश जाधव, कल्याण धुमाळ, कैलास महाडिक, श्रीधर कांबळे यांनी तीव्र स्वरूपात निषेध नोंदवून सदरचा खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा व आरोपीस कठोरात कठोर शिक्षा बजावण्यात यावी, तसेच सर्व शाखा कार्यालया व उपकेंद्र करिता सुरक्षा रक्षकाची तातडीने नेमणूक करण्यात यावी, त्याचबरोबर महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कर्मचाऱ्यांना लोकसेवकाचा दर्जा मिळवून देण्यासाठी युद्ध पातळीवर मुख्य कार्यालयाच्या प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात यावेत अशी मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी प्रशासनाच्या वतीने मा.पावडे साहेब मुख्य अभियंता, बारामती परिमंडळ. यांनी द्वार सभेसाठी जमलेल्या सर्व संयुक्त कृती समितीच्या सदस्या समोर गेट मिटींगला सामोरे जाऊन त्यांनी त्यांच्या भावना जमलेल्या कर्मचाऱ्यांसमोर व्यक्त केल्या व कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. झालेल्या घटनेची दखल घेऊन मुख्य कार्यालयाकडे व परिमंडळ स्तरावरून त्याच्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल याबाबत अश्वस्त केले. यावेळी बारामती ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री.पाटील साहेब, श्री वायदंडे साहेब उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, श्री सोनवलकर साहेब कार्यकारी अभियंता बारामती विभाग. हे द्वार सभेस उपस्थित होते.