फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) : –
बारामती येथील युवा सामाजिक कार्यकर्ते प्रितम गुळूमकर यांना व्यंकटेश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आळंदी पुणे या संस्थेमार्फत पुरस्कार देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय सेवा योजना, विद्यापीठ प्रतिनिधी,पोलीस मित्र संघटना अंतर्गत आणि इतर सामाजिक व शासकीय संस्थांच्या माध्यमातून त्यांनी विविध समाज उपयोगी व विधायक कार्यक्रम राबवले आहे. त्याची दखल घेत त्यांना पुरस्कार जाहीर केला आहे.
ते गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात हिरहिरीने भाग घेऊन रक्तदान व वृक्षारोपण तसेच अनेक लोकोपयोगी कार्य केले आहे व करत आहेत. अतिशय कमी वयात त्यांनी समाजसेवेला सुरुवात केली आहे.
याप्रसंगी त्यांना बारामती तालुक्यातील सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मिञ परिवार आणि कुटुंबातील सर्व नातेवाईक आदींनी त्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.