खेळाडूंनी सातत्य च्या जोरावर ध्येय गाठावे: अर्जुन पुरस्कार विजेते अशोक शिंदे बारामती स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने प्रशिक्षण शिबीर व खेळाडूचा सन्मान

बारामती स्पोर्ट्स अकॅडमी च्या गुणवंत खेळाडूचा सत्कार करताना मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –

सातत्य व आत्मविश्वास या जोरावर आपण खेळा मध्ये यश मिळवू शकता व आपल्या ध्येया पर्यंत पोहचवू शकता असे प्रतिपादन अर्जुन पुरस्कार विजेते अशोक शिंदे यांनी केले.
बारामती स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने उन्हाळी प्रशिक्षण शिबिर चा शुभारंभ व गुणवंत खेळाडूंचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुन पुरस्कार (कबड्डी) विजेते अशोक शिंदे यांनी प्रतिपादन केले.
 या प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रो कबड्डी सीजन १० विजेते पुणेरी पलटण संघाचा कर्णधार असलम इनामदार प्रमुख अतिथी व बारामती
तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले , पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन चे सदस्य सतपाल गावडे, शंभू भोपळे,वसीम इनामदार राष्ट्रीय खेळाडू मंगेश मुरकुटे , बारामती स्पोर्ट्स चे सदस्य दत्ता चव्हाण, खजिनदार बारामती स्पोर्ट्स अकॅडमी मोहन कचरे, स्ट्रेंन्थ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक शिवाय पायघान , प्रो कबड्डी खेळाडू बंगाल वॉरियर्स दीपक शिंदे ,प्रो कबड्डी खेळाडू बंगाल वॉरियर्स श्रेयश उमरदंड , बारामती स्पोर्ट्स साठी खेळाडू ऋषिकेश बनकर, ओंकार गाडे, ओंकार लाळगे, ओंकार शिंदे, साक्षी काळे, ऐश्वर्या झाडबुके व प्रशिक्षक,खेळाडू व पालक उपस्तीत होते.
यश मिळवणे साठी सराव तर कराच परंतु यश मिळवल्यावर टिकवणे साठी सुद्धा सराव आवश्यक आहे दिखाऊ न राहता टिकाऊ रहा असा सल्ला अस्लम इनामदार यांनी खेळाडूंना दिला.
ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे मैदान प्राप्त होणे व योग्य मार्गदर्शन मिळावे , कबड्डी खेळाचा प्रसार व प्रचार व्याहवा त्यामधून गुणवंत खेळाडू निर्माण होणे साठी बारामती स्पोर्ट्स अकॅडमी ची स्थापना केली असून २०१७ पासून गुणवंत व प्रतिभावंत खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवरील तयार झाले आहेत हे खास वैशिष्ट्य असून दरवर्षी हा उपक्रम जिल्हा क्रीडा संकुल येथे होत असतो नवीन विध्यार्थी व खेळाडूंनी त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन बारामती स्पोर्ट्स अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष 
प्रो कबड्डी खेळाडू व एन. आय. एस. कोच दादासो आवाड यांनी सांगितले.
या वेळी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील यशस्वी खेळाडूचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
 कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अजिनाथ खाडे यांनी केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!