फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
आजी माजी सैनिक यांनी देशासाठी दिलेले योगदान महत्वाचे असून त्यांचा आदर करून त्यांची प्रतिष्ठा प्रत्येकांनी जपली पाहिजे प्रत्येक भारतीयांसाठी त्यांचे कार्य अभिमानास्पद व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
जय जवान माजी सैनिक संघटना बारामती यांच्या वतीने सोमवार दि १५ एप्रिल रोजी सैनिक मेळावा चे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अजित पवार बोलत होते.या प्रसंगी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती बँक चेअरमन सचिन सातव, मा नगरसेविका कमल कोकरे, मा. सभापती अविनाश गोफने व
राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेश अध्यक्ष दीपक शिर्के, पुणे शहर अध्यक्ष अविनाश ढोले व जय जवान माजी सैनिक संघटना बारामती अध्यक्ष हनुमंत नींबाळकर, सचिव राहुल भोईटे खजिनदार नामदेव सायार,कार्याध्यक्ष भारत जाधव, सदस्य रवींद्र लडकत,शिवाजी साळुंखे, गणपत फडतरे, रमेश रणमोडे,शिवलिंग माळी, भारत मोरे, विलास कांबळे, अभय थोरात, पोपट निकम, शिवाजी साळुंखे, श्रीमती वैशाली मोरे,शोभा घाडगे व मधुकर बोरवके, कल्याण पाचांगणे आदी मान्यवर उपस्तीत होते.
सैनिक च्या हितासाठी बारामती घरपट्टी माफ केली असताना या पुढेही सैनिक व त्यांच्या कुटूंबीय साठी कार्य करत राहणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
सेवा निवृत्ती नंतर सुद्धा सामाजिक बांधिलकी जोपासत सैनिकांनी विविध क्षेत्रात कार्य केले व करीत आहेत व शहीद परिवाराचा सन्मान आणि कडक लॉकडाऊन मध्ये पोलीसाच्या बरोबर कार्य केल्याचे अध्यक्ष हनुमंत नींबाळकर यांनी सांगितले.
या प्रसंगी माजी सैनिक सेल च्या पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. सूत्रसंचालन श्री सावळेपाटील यांनी केले व आभार अभय थोरात यांनी मानले.