शिबिरातील खेळाडूंना मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,यावेळी उपस्थित डॉ.योगेश गांधी शिवाजीराव घोरपडे, महादेवराव माने, बाबासाहेब गंगवणे, ए वाय ननवरे, शिरीष वेलणकर संजय फडतरे बंडू खुरंगे तायप्पा शेंडगे इत्यादी मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि.१६ ) :
फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती, फलटण व फलटण जिमखाना फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर सोमवार दि. 15 एप्रिल ते 24 एप्रिल 2024 दरम्यान मा. आमदार श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल, फलटण येथे आयोजन करण्यात आले आहे. फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित विविध शाळा, माध्यमिक विद्यालये, महविद्यालयातील सुमारे 450 विद्यार्थी विद्यार्थिनी या शिबीरात सहभागी झाले आहेत. शिबीराचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी व महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की फलटणला खो – खो, हॉकी, फुटबॉल या खेळाची फार मोठी परंपरा आहे. ही परंपरा अखंडित सुरु ठेवण्यासाठी सर्व क्रीडा शिक्षक व खेळाडूंनी चांगला सराव व खेळामध्ये सातत्य ठेवले तर राज्य , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू तयार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आगामी काळामध्ये खो – खो, कबड्डी, हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, हॉकी, फुटबॉल अशा विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्याची सूतोवाच करतानाच फलटण तालुक्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करुन उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीरात सहभागी खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन श्री.शिवाजीराव घोरपडे,श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा क्रीडा समितीचे सदस्य श्री महादेवराव माने, क्रीडा समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री शिरीष वेलणकर, श्री .संजय फडतरे, मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. बाबासाहेब गंगवणे, रावडी विद्यालयाचे प्राचार्य श्री ए. वाय . ननवरे, डॉ. योगेश गांधी,पर्यवेक्षक वसंतराव शिंदे,नितीन जगताप, माने सर यांच्यासह विविध खेळाचे क्रीडा मार्गदर्शक व खेळाडू उपस्थित होते.
या शिबीरामध्ये हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, खो – खो, ॲथलेटिक्स, धनुर्विद्या या खेळांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार असून. माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल, फलटण येथील क्रीडांगणावर हॉकी, फुटबॉल व खो – खो या खेळांसाठी सराव व मार्गदर्शन करण्यात येणार आहे तर मुधोजी महाविद्यालय, फलटणच्या क्रीडांगणावर ॲथलेटिक्स तर मुधोजी क्लब येथे बास्केटबॉल या खेळाचे तर श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल जाधववाडी येथे आर्चरी या खेळासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
हॉकी या खेळसाठी मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून श्री महेश खुटाळे, श्री. सचिन धुमाळ, श्री खुरंगे बी.बी.,कु. धनश्री , फुटबॉलसाठी श्री अमित काळे, श्री उत्तमराव घोरपडे, मोनील शिंदे, प्रध्दुमन वाळकुंदे, बास्केटबॉल साठी श्री. बळवंत बाबर , श्री.रोहन निकम,ॲथलेटिक्स साठी श्री राज जाधव, श्री. जनार्दन पवार, प्रा. तायाप्पा शेंडगे , खो – खो साठी श्री .अविनाश गंगतीरे, श्री. सुहास कदम, मुलाणी मॅडम, आर्चरी साठी श्री .सुरज ढेंबरे श्री राजेंद्र माडकर हे शिबीरार्थी खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत.
सदर शिबीरामध्ये खेळाडूंची शारीरिक क्षमता, खेळाडूंचा आहार या संबंधीत खेळाचे कौशल्य याविषयी तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शिबिरातील सहभागी खेळाडू यांना दररोज सकाळी सरावानंतर अल्पोपहार दिला जाणार आहे. व शिबिर पूर्ण केल्यानंतर सर्व सहभागी खेळाडू यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.