फलटण टुडे वृत्तसेवा : –
भारत निवडणूक आयोगा मार्फत sveep अंतर्गत मतदारा मध्ये मतदाना बाबत जनजागृती साठी व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रम द्वारे काम सुरु आहे
43 माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 255 फलटण (अ.जा ) विधानसभा मतदार संघा मध्ये मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीसाठी फलटण येथे 13 एप्रिल रोजी सकाळी 7.00 वाजता श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण YC हायस्कूल एसटी स्टँड शेजारी फलटण येथे मानवी साखळी द्वारे मतदान जनजागृतीचे आयोजन करण्यात आले आहे
मा सचिन ढोले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार फलटण डॉ अभिजीत जाधव, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आयोजन केले आहे
यामध्ये सर्वं विभागातील शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील शिक्षक विद्यार्थी तसेच नगरपालिकेतील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, लायन्स क्लब तसेच BLO आणि सेवाभावी संस्था तसेच महिलां बचत गट तसेच मतदार यात सहभागी होणार आहेत
“चला तर मंग या”
“आपण पण सहभागी होऊ या”
“मतदार राजा जागा हो”
“लोकशाही चा धागा हो “
*मानवी साखळी द्वारे भारताचा नकाशा तयार करण्यात येणार आहे*
फलटण 100 टक्के मतदान
मानवी साखळी चे आयोजन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अंतर्गत स्वीप नियोजन कक्ष फलटण जिल्हा सातारा याच्या वतीने करण्यात आले आहे