शरदचंद्र पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार :- चेतन सुभाष शिंदे

फलटण टुडे वृत्तसेवा दि. 10 : :-

आज बुधवार दि. १० एप्रिल २०२४ रोजी फलटण येथील जिद्द बंगल्यावरती चेतन भैय्या शिंदे यांची पत्रकार परिषद झाली यावेळी बोलताना चेतन भैय्या शिंदे यांनीआदरणीय सुभाषराव शिंदे (भाऊ) यांनी आयुष्यभर आदरणीय श्री.शरदचंद्रजी  पवार साहेब यांना दैवत मानून फलटण तालुक्यात प्रत्येक गावात आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागळात रुजविण्याचे काम केले.त्यांनी कोणत्या प्रकारची जात-पात, गट-तट न मानता सर्वसामान्य,गोरगरीबासाठी काम करत असताना राजकारणाची सुरुवात ते शेवटच्या
श्वासापर्यंत आदरणीय पवारसाहेबांशी एकनिष्ठ राहिले.

त्याचप्रमाणे भाऊंनी आम्हाला घालुन दिलेला आदर्श व विचार पुढे नेण्यासाठी रविवार, दि. ०७ एप्रिल२०२४ रोजी ‘गोविंद बाग’ या ठिकाणी जावुन आदरणीय पवार साहेबांचे आशिर्वाद घेतले असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदार संघातील फलटण तालुक्यातील आदरणी पवार साहेब व आदरणीय सुभाष भाऊ यांच्या सहकाऱ्यांना, सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, युवक-युवती, महिला तसेच महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्ष यांच्याशी प्रत्यक्ष भेटून आदरणीय पवार साहेबांचे व सुभाषभाऊ यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार आहोत, आदरणीय पवार साहेब हेच आमचा पक्ष व उमेदवार असे मानूनच आम्ही काम करणार आहोत.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या काळात फलटण तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती दौरा करून पुर्ण ताकदीने हा विचारांचा लढा आम्ही आदरणीय पवारसाहेबांसोबत राहुन लढणार आहोत. असे मत श्री चेतन भैय्या शिंदे यांनी व्यक्त केले .

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!