फलटण टुडे वृत्तसेवा दि १० :-
क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती निमित्त उद्या फलटण शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून बाईक रॅली क्रांतीसुर्य महात्मा फुले चौक -महात्मा गांधी चौक- राम मंदिर- पाचबती चौक-बारामती चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक- नाना पाटील चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – पुण्यश्लोक अहिल्याबाई चौक – गिरवी नाका – मुधोजी कॉलेज रोड – बाणगंगा नदी पलिकडे – सावित्रीमाई फुले चौक – फलटण ग्रामिण पोलिस स्टेशन- मारवाड पेठ रोड – जैन मंदिर – क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले चौक येथे समाप्त होईल व तिथून पुढे दुसरे कार्यक्रम चालू होतील बाईक रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्यांना विशेष सूचना आपण सहभागी होणाऱ्या समाज बांधवांनी महामानवांच्या विचारांना साजेशी अशी रॅली पूर्ण करायची आहे यामध्ये कोणीही आपल्या गाडीचा हॉर्न वाजवणार नाही कोणीही एकमेकांना ओव्हरटेक करायचा प्रयत्न करणार नाही कोणत्याही चुकीच्या घोषणा देणार नाही समाजाच्या नावलौकिकास कुठल्याही प्रकारे तडा जाणार नाही असे वर्तन करायचे आहे कृपया यामध्ये कोणीही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना त्वरित रॅली मधून बाहेर काढले जाईल तरी पुन्हा एकदा सर्वांना विनंती कोणीही गाड्यांचे हॉर्न वाजवायचे नाही जय ज्योती जय क्रांती*