*
निवडणूक निर्णय अधिकारी
43माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. 07 ) :-
भारत निवडणूक आयोगामार्फत मतदारांमध्ये मतदान करणे बाबत जनजागृती चे विविध उपक्रम सुरु आहे
माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत २५५ फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार मध्ये मतदान जनजागृती निमित्त विविध उपक्रम रबविण्यात येत आहे
सजाई गार्डन येथे केंद्रअध्यक्ष व मतदान अधिकारी प्रशिक्षण प्रसंगी येथे sveep अंतर्गत संकल्प आमचा 100 टक्के मतदानाचा या स्वाक्षरी मोहीम शुभारंभ निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिहं व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या शुभहस्ते स्वाक्षरी करून करण्यात आले यावेळी तहसील फलटण अभिजित जाधव तसेच इतर मान्यवर यांच्या उपस्थिती करण्यात आला
तसेच तहसीलदार कार्यालय फलटण परिसरामध्ये स्वाक्षरी मोहीम फ्लेक्स बोर्ड मतदारांना स्वाक्षरी मोहीम मध्ये सहभागी होण्यासाठी ठेवण्यात येणार आहे या ठिकाणी फलटण तालुक्यातून नागरिक कामानिमित्त येत असल्यामुळे या स्वाक्षरी मोहीम मुळे मतदारांमध्ये मतदान बाबत जनजागृती करण्यासाठी मदत होणार आहे
श्रीराम बझार फलटण येथे sveep अंतर्गत मतदार जनजागृती मोहीम प्रसंगी मतदार यांनी आपला मतदाना चा हक्क बजावा आणि मतदारा मध्ये मतदान करण्यासाठी आपण सर्वांनी या उत्सव लोकशाहीचा अभिमान देशाचा यामध्ये सहभागी होऊन मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदारानं मध्ये मतदान करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे तसेच मतदान केल्या नतंर सेल्फी फोटो शेर करून इतर लोकांना मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करणे बाबत अहवान मोनिका सिहं यांनी केले नागरिकांना जागरूकतेने मतदान करण्याची शपथ त्यानी दिली…
यावेळी स्विप सहाय्यक अधिकारी फलटण सचिन जाधव यांनी सूत्रसंचालन केले यावेळी शबाना बागवान निवडणूक नायब तहसीलदार, श्री एस के कुंभार स्वीप नोडल ऑफिसर, शहाजी शिंदे पथक प्रमुख, श्री लक्ष्मण आहिवळे तलाठी तसेच स्वीप टीम उपस्थित होते