फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ७ ): –
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा (चौवार्षिक निवडणूक कार्यक्रम २०२४-ते २०२८) आज दि ७ रोजी दुपारी १२ वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे संपन्न झाली, यामध्ये महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.