४३ माढा लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर २५५ फलटण – कोरेगाव (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात नियुक्त केंद्राध्यक्ष, मतदानअधिकारी व इतर निवडणूक कर्मचा-यांचे प्रशिक्षण दि.६ एप्रिल २०२४ व ७ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आले. यावेळी सुमारे १६२३ कर्मचारी उपस्थित होते.
सदरप्रशिक्षणा नंतर मतदान यंत्राचे हाताळणी प्रात्यक्षिक संबंधित कर्मचा-यांना देणेत आले अशी माहिती फलटण प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
यावेळी सचिन ढोले म्हणाले, लोकसभा निवडणूकीसाठी केंद्राध्यक्ष व मतदान अधिका-यांना शनिवारी व रविवारी चार टप्प्यांत प्रशिक्षण देण्यातआले आहे.फलटण -कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर सुमारे १६२३केंद्राध्यक्ष, मतदानअधिकारी व इतरनिवडणूक कर्मचा-यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. कर्मचा-यांना तीन भागात प्रशिक्षण देण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना व मतदान प्रक्रिया कशी पार पाडावी याची माहिती देण्यात आली आहे.
सदरचे प्रशिक्षण सजाई गार्डन मंगल कार्यालयामध्ये घेणेत आले. सदर प्रशिक्षणासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थी यांना प्रशासनाच्या वतीने जेवण, पाणी, सुसज्ज बैठक व्यवस्था करणेत आली होती. प्रशिक्षणार्थी यांना डीजिटल स्क्रीनवर प्रशिक्षण देणेत आले. तसेच प्रशिक्षणार्थी यांना ई.व्ही.एम. मशीन हाताळणेसाठी उपलब्ध करून देणेत आल्या. सदरचे प्रशिक्षणास मा. निवडणूक निर्णय अधिकारी,४३ माढा लोकसभा यांनी भेट देवून सर्व व्यवस्था चांगली केली असल्याचे व नेटके नियोजन केलेची प्रतिक्रिया दिली असल्याची माहिती श्री. सचिन ढोले, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.