फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्या मंदिर, सस्तेवाडी. प्रशालेत मातृ-पितृ पूजन व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला .
आई-वडिलांचा आदर ठेवावा घरातून बाहेर पडताना आई-वडिलांना नमस्कार करा तो आशीर्वाद कधीच वाया जाणार नाही असा संदेश सौ वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर चेअरमन शाळा समिती यांनी केला.
कार्यक्रमाला पालकांनी मोठा प्रतिसाद दिला .
यावेळी बहुसंख्येने पालक उपस्थित होते कार्यक्रमाला ह.भ. प. श्री रामदास जगताप गुरुजी वाठर निंबाळकर कीर्तनकार यांनी विद्यार्थी पालक यांना त्यांच्या ओघळत्या वाणीतून बहुमोल मार्गदर्शन केले शाळेतून घेतलेल्या उपक्रमाबद्दल मोलाचे बहुमोलचे मार्गदर्शन केले शाळेत घेतलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक करून आतापर्यंत केलेल्या कार्यक्रमात मी पहिल्यांदाच असा कार्यक्रम पाहिला आहे या कार्यक्रमाचे मूल्य फार मोठे आहे. मूल्य हे मनातल्या संस्कारावर ठरत असते, तो संस्कार मुलांना पुढे घेऊन जात असतो.शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांनी नम्र रहावे,एक आठवण विद्यार्थ्यांचे जीवन उजळू शकते. शाळेने घेतलेला मातृ-पितृ पूजन कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनभर स्मरणात राहील
कार्यक्रमाला शाळा समितीच्या चेअरमन, मा. सौ वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर.मा. श्री चंद्रकांत पाटील सर,शाळा समिती सदस्य.मा. श्री अरविंद निकम सर, प्रशासनाधिकारी,फलटण एज्युकेशन सोसायटी,फलटण. मा.श्रीम रणवरे मॅडम निमंत्रित सदस्या.सौ. सावंत मॅडम मुख्याध्यापिका,श्रीमंत सुगणामाता बालक मंदिर,फलटण. उपस्थित होते.
बहुसंख्येने पालक- विद्यार्थी उपस्थित होते.मुख्याध्यापिका श्रीमती अनिताराणी कुमार कुचेकर यांचे मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षकांच्या परिश्रमाने कार्यक्रम पार पडला.सूत्रसंचालन तेजस्विनी शिंदे यांनी केले आभार सुवर्णा घनवट यांनी मानले.