महाराष्ट्र चेंबर च्या पदाधिकारी व बांधकाम व्यवसाईक यांचा सन्मान करताना निरंजन काणे व सोबत इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी ) : –
जागतिक स्तरावर बांधकाम क्षेत्रात दररोज नवनवीन बदल होत आहेत,अत्याधुनिक तंत्रज्ञान येत आहे गुणवत्ता व दर्जात्मक व दीर्घकाळ टिकाऊ बांधकामे होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान ची माहिती बांधकाम व्यवसाईक यांनी वेळोवेळी घ्यावी व त्याप्रमाणे बांधकामात त्या तंत्रज्ञान चा वापर करावा असे प्रतिपादन स्कॉन इन्फ्रा प्रेस्ट्रेस एल एल पी चे उपाध्यक्ष निरंजन काने यांनी केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, एग्रीकल्चर बारामती शाखा व स्कॉन इन्फ्रा यांच्या वतीने बारामती तालुक्यातील बांधकाम व्यवसायिक, व्यापारी , उद्योजक, व बांधकाम क्षेत्राशी संलग्न व्यवसाईक यांच्या साठी चर्चासत्र व मार्गदर्शन कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी निरंजन काणे यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महाराष्ट्र चेंबर चे चेअरमन शरद सूर्यवंशी, उपाध्यक्ष शिवाजीराव नींबाळकर,बारामती रिजन चे उपाध्यक्ष सुशील सोमाणी,सदस्य,प्रफुल्ल तावरे, मनोज तुपे व क्रेडाई चे अध्यक्ष राहुल खाटमोडे ,बिल्डर असोसिएशन चे अध्यक्ष शामराव राऊत, सार्वजनिक बांधकाम विभाग चे उपअभियंता रामसेवक मुखेकर व सदस्य उपस्तीत होते.
महाराष्ट्र चेंबर च्या वतीने विविध कार्यक्रम, चर्चासत्र, कार्यशाळा, तज्ञांचे मार्गदर्शन च्या माध्यमातून बांधकाम व्यवसाईक व संबंधित व्यवसाईक यांना सहकार्य करण्यास कटिबद्ध असल्याचे चेअरमन शरद सूर्यवंशी यांनी सांगितले.
बांधकाम व्यवसाईक यांनी नवीन बदलाचा अभ्यास करून ग्राहकांना उत्तम बांधकामे द्यावीत असे शिवाजीराव नींबाळकर यांनी सांगितले.
राहुल खाटमोडे,शामराव राऊत व किरण भोईटे यांनी मनोगत व्यक्त केले
पुल बांधणे, अद्यावत व भव्य इमारत बांधणे, दगडाची बांधकामे आदी बांधताना वापरावयाचे साहित्य ,दक्षता,वेळ आदी बाबत बांधकाम व्यवसाईक यांच्या प्रश्नांना उत्तरे निरंजन काणे यांनी दिली.
सूत्रसंचालन श्री सावळेपाटील यांनी केले तर आभार सुशील सोमाणी यांनी मानले