रेडीरेकनर दरात यावर्षीही वाढ नाही: राहुल खाटमोडे बारामतीच्या बांधकाम क्षेत्रातून स्वागत : तेजी येण्याचे संकेत

राहुल खाटमोडे 

अध्यक्ष, क्रेडाई बारामती
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): – 
बाजारमूल्य दर तक्त्याच्या (रेडीरेकनर) २०२३-२०२४ च्या वार्षिक दर विवरणपत्रात कोणतेही बदल न करता २०२४-२५ साठीचे तेच दर चालू ठेवण्यात यावेत असे पत्र महसूल विभागाने राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक यांना पाठविले आहे. दरम्यान रेडीरेकनर दरात यावर्षीही वाढ होणार नसल्याने बांधकाम क्षेत्रातून स्वागत होत आहे 
बाजारातील जमिनीचे दर व बांधकामाचा खर्च पाहता सर्वसामान्यांना घरे परवडायला हवी असतील तर सध्या तरी या रेडीरेकनर दारामध्ये कुठलीही वाढ करू नये, अशी मागणी महाराष्ट्र क्रेडाईतर्फे करण्यात आली होती. दरम्यान शासनाच्या महसूल विभागाने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांना पत्र काढून २०२३-२४ चे दर २०२४-२५ साठी चालू ठेवावेत, असे कळवले आहे . त्यामुळे या वर्षीही रेडीरेकनर दरात वाढ होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. बांधकाम क्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
या वर्षीसाठी रेडीरेकनरच्या दरात कोणतीही वाढ करू नये अशी मागणी क्रेडाई संघटने कडून महाराष्ट्र शासनाकडे केली होती. सरकारने आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रेडीरेकनरच्या दरात कोणतीही वाढ व बदल केले नाहीत. सरकारने वाढ न करणेचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. क्रेडाई बारामतीच्यावतीने महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहे
. सरकारच्या या निर्णयामुळे रियल इस्टेट क्षेत्रात कोरोनानंतर आलेले तेजीचे वातावरण आणखी सकारात्मक राहील अशी माहिती 
राहुल खाटमोडे, अध्यक्ष, क्रेडाई बारामती यांनी दिली 

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!