योग प्रात्यक्षिक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करत असताना हेमंत नवसारे,सुनील शिंदे व इतर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
बारामती शहरातील न्यू युवा शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘योग व मल्लखांब प्रात्यक्षिक’ चे सादरीकरण करण्यात आले.
याप्रसंगी द्रोणाचार्य स्पोर्ट्स क्लब च्या वतीने विविध योग व मल्लखांब चे सादरीकरण करण्यात आलं यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला होता.
भारताने जगाला दिलेली योग व मल्लखांब ही एक महान देणगी आहे.
योग करा निरोगी रहा आणि आजारांपासून दूर राहा असा संदेश याप्रसंगी देण्यात आला. लहान बालकांनी अवघड व चित्तथरारक कसरती सादर केल्या प्रशिक्षक शिवानी गवळी काटकर आणि आकाश गवळी यांनी मार्गदर्शन केले
यावेळी न्यू शिवक्रांती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत नवसारे, छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती बारामती तालुका अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या सहित अनेक मान्यवर उपस्थित होते .गड किल्ले संवर्धन करा, जतन करा, एतेहसिक वारसा पुढील पिढीला सांगा ,प्लास्टिक मुक्त किल्ले व पर्यटन करूया आदी विषयी आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धेचे ही यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव भेटावा व खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे व एतेहसिक वारसा चे जतन होणे साठी जनजागृती व्याहवी म्हणून विविध कार्यक्रम व दरवर्षी योग विद्या,मल्लखांब व विविध क्षेत्रातील खेळाडूंचा सन्मान करण्यात येत असल्याचे अध्यक्ष हेमंत नवसारे यांनी सांगितले.