फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण ) : –
ज्ञानदा मोक्षदा सचिन कदम हिने वयाच्या अवघ्या नऊ व्या वर्षी भगवदगीता हा संपुर्ण ग्रंथ ३ वर्षात संस्कृतमध्ये कंठस्थ करून रविवारी दिनांक ३१/ ०३ / २०२४ गीता परिवाराने घेतलेल्या गीताव्रती परीक्षेमध्ये पुर्ण १८ अध्याय ७०० श्लोक *६०० गुणांपैकी ५८९ गुण मिळवून* *गीताव्रती ही पदवी मिळवली आहे.* सर्वात लहान वयात भगवद्गीता पाठांतर असणारी व संस्कृत विषयाचे ज्ञान असणारी ज्ञानदा कदम ही गिरवी गावातील सर्वात लहान मुलगी आहे.तसेच ती संस्कृत भाषा सुद्धा खूप छान शिकत आहे आणि इतरांना सुद्धा शिकण्यासाठी प्रवृत्त करत आहे
ज्ञानदा कदम या मुलीने यापूर्वीसुद्धा सायकलिंग, रॉक क्लाइंबिंग मध्ये यश मिळवले आहे
ती मुलींना एक संदेश देते आहे मुलींनो शस्त्र आणि शास्त्र हाती घ्या शस्त्र हाती घेतलेले तर मनगट बळकट होईल आणि शास्त्र हाती घेतले तर मन बळकट होईल मन आणि मनगट बळकट असेल कोणासमोरही अबला म्हणून झुकावे लागणार नाही