विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अविनाश धर्माधिकारी व व्यासपीठावर डॉ अतुल गरगडे व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
यश मिळवण्यासाठी प्रयत्न जिद्द व आत्मविश्वासाची आवश्यकता आहे दिखाऊ न राहता टिकाऊ रहा मोबाईल कामापूरता वापरा, अभ्यास मध्ये सातत्य ठेवा, प्रत्यनाची प्रयत्नांची पराकाष्टा कराल तरच यश मिळेल असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळाचे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी केले .
बारामती येथील द्रोणाचार्य अकॅडमीच्या वतीने सीईटी, नीट ,जेईई यासाठी प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यां साठी ‘द्रोणाचार्य टॅलेंट हंट’ परीक्षा घेण्यात आली या मध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं होते.
या प्रसंगी द्रोणाचार्य अकॅडमीचे संस्थापक संचालक डॉ अतुल गरगडे,धाराशिव जिल्ह्यचे कृषी अधिकारी दीपक गरगडे ,सरडे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भरत गरगडे ,मार्केटिंग हेड प्रदीप मुटकुळे व विनायक पवार विनोद पवार ,पंकज शिंदे व प्रा पंकज शिंदे आदी मान्यवर व बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस आदी तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्तीत होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठया शहरात न जाता त्यांचा व पालकांचा अमूल्य वेळ व पैसा वाचावा आणि विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी द्रोणाचार्य अकॅडमी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन द्रोणाचार्य अकॅडमीचे संस्थापक संचालक डॉ अतुल गरगडे यांनी केले.
मुंबई येथे अनेक विद्यार्थ्यांना घडविल्यावर ग्रामीण भागात सुद्धा गुणवंत विद्यार्थी घडावेत म्हणून प्रशिक्षित अध्यापक वर्ग,सर्व प्रकारच्या अध्यापनाच्या सोयी उपलब्ध असणारी द्रोणाचार्य अकॅडमी गुणवत्ता व दर्जा देणारच असल्याची माहिती समनव्यक प्रा समीर गवळी यांनी दिली
या प्रसंगी दीपक गरगडे,पंकज शिंदे ,विनायक पवार व विद्यार्थी, पालक आदींनी मनोगत व्यक्त केले
यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान याप्रसंगी करण्यात आला.
———————————–