फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
हिंदवी स्वराज्याचे शिलेदार सरदार भिकाजी बीन सूर्याजी डिंबळे सर पाटील प्रतिष्ठान बारामती यांच्यावतीने शिवजयंती निमित्त कल्याण दरवाजाचा देखावा उभा करण्यात आला होता याप्रसंगी शिवप्रेमींनी सदर देखावा पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी केली याप्रसंगी माळेगाव कारखान्याचे मा. चेअरमन रंजन तावरे ,बारामती विधानसभा निवडणूक प्रमुख, संतोष सातव , बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संतोष सातव, आडतव्यापरी सचिन मधुकर सातव, प्रकाश जगताप, तालुकाध्यक्ष भाजपा आकाश कांबळे, श्याम कोकरे, ऍड ज्ञानेश्वर माने, गोविंद देवकाते, सतीश फाळके ,राजेश कांबळे ,विजयकुमार देवकाते, वैभव सोलंनकर, संदीप केसकर ,रोहन कांबळे, अमोल प्रभुणे समस्त कल्याण व बारामती येथील डिंबळे सरपाटील परिवार उपस्तीत होते.
कल्याण दरवाजाचे महत्व आणि तेथील इतिहास प्रमोद डिंबळे पाटील यांनी सांगितला . याप्रसंगी गड किल्ले संवर्धन या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.