फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
ऑल इंडिया स्पोर्ट्स फेडरेशन व इंग्लिश मेडिअम स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन च्या वतिने खेळाडू, प्रशिक्षक व आई वडिलांचा सन्मान
” ऑल इंडिया स्पोर्ट्स डायमंड अवॉर्ड २०२४” हा पुरस्कार देऊन रविवार ३१ मार्च रोजी बारामती मध्ये करण्यात आला.
या प्रसंगी इंग्लिश मेड़ीयम स्टूडेंट स्पोर्ट्स असो अध्यक्ष आशिष डोईफोडे उपाध्यक्ष श्री पाटील,प्रसिद्ध सिने अभिनेते ऍड महेश दादा देवकाते पाटील , बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत, सृजन सोशल वेलफेअर फौंडेशन चे अध्यक्ष प्रा. विशाल भोसले,पोलीस हवालदार विलास मोरे, शंकर काळे, सोलापूर चे माधव शेरीकर, बेळगाव चे मल्लिकार्जुन नडुगेरे, सांगली चे बापू पाटील आदी मान्यवर व विविध राज्यातील खेळाडू, प्रशिक्षक उपस्तीत होते.
जिद्द चिकाटी व आत्मविश्वास या जोरावर यश मिळू शकतो, मोबाईल पासून दूर राहा,कामापूरता मोबाईल वापरा ,मैदानी खेळ खेळा, देशासाठी विविध खेळात पदके मिळवा व जीवन सार्थकी लावा असा सल्ला प्रसिद्ध चित्रपट अभिनेते ऍड महेश देवकाते पाटील यांनी केले.
विविध स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारे ग्रामीण भागातील खेळाडू व प्रशिक्षक व त्यांच्या आई वडिलांचा आत्मविश्वास वाढावा शाबासकी मिळावी व पुन्हा त्यांच्या हातून उतुंग कामगिरी व्याहवी , त्यांच्या कार्याची दखल घेऊन गेल्या आठ वर्षांपासून सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असल्याचे ऑल इंडिया स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष आशिष डोईफोडे यांनी सांगितले.
खेळाडूंना पोलीस क्षेत्रात संधी आहेत त्या साठी पोलीस भरती मध्ये प्रत्यन करा यश मिळणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत यांनी सांगितले.
यश म्हणजे प्रत्यन व ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याग असल्याचे प्रा. विशाल भोसले यांनी सांगितले.
खेळाडू प्रशिक्षक व पालक यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केली.
सूत्रसंचालन श्री सावळेपाटील केले तर आभार श्री पाटील यांनी मानले.