फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती)ः –
रोटरी क्लब ऑफ बारामती व सुशीला एक्सीडेंट हॉस्पिटल यांच्यामार्फत बारामती मधील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत अस्थिरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. आज समाजातील वय वर्ष ५५ च्या पुढील नागरिकांमध्ये हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे तरी त्यांनी त्यांची रेगुलर तपासणी करून घेणे गरजेचे आहे असे मत सुशीला एक्सीडेंटल हॉस्पिटलचे डॉ. गोकुळ काळे यांनी व्यक्त केले व आपला आहार कसा असावा, कोणत्या प्रकारचे व्यायाम आपण करणे गरजेचे आहे याबद्दल देखील मार्गदर्शन केले.
या शिबिरामध्ये ८० लोकांच्या मोफत बोन मिनरल टेस्ट करण्यात आल्या तसेच या तपासणीच्या निष्कर्षाप्रमाणे रोटरी क्लब ऑफ बारामती तर्फे त्यांना मोफत औषधे देखील देण्यात आली.
सदर शिबिराचे उद्घाटन शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला वहिनी पवार यांच्या हस्ते करण्यात आले , त्यांच्यासोबत सदाशिव बापू सातव, सतीश मामा खोमणे,ॲड. संदीप गुजर , सत्यवृत्त काळे उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ बारामती तर्फे अध्यक्षा सौ. दर्शना गुजर, सचिव अभिजीत बर्गे, खजिनदार रविकिरण खारतोडे, अजय दरेकर, हनमंतराव पाटील, कौशल शहा, अतुल गांधी, पार्श्ववेंद्र फरसुले, अलीअसगर बारामतीवाला, अरविंद गरगटे, प्रफुल गादिया, निखिल मुथा, मेहुल दोशी,किशोर मेहता, दत्तात्रय बोराडे, अंजली गांधी उपस्थित होते.