फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती:प्रतिनिधी)ः –
ऑफिसर ट्रेनिंग ॲकॅडमी , नागपूर येथे दि.26 मार्च 2024 रोजी प्रशिक्षणार्थी एएनओ ऑफिसर ट्रेनिंग (आर्मी ) कोर्स क्रमांक 179 या तुकडीचा सांगता समारंभ व दीक्षांत संचलन सोहळा मेजर जनरल राजेश कुमार सचदेवा (अतिरिक्त महासंचालक, जम्मू काश्मीर आणि लडाख संचालनालय) यांच्या उपस्थित पार पडला. संपूर्ण देशभरातून एकूण 525 अधिकाऱ्यांची ही तुकडी गेले 2 महिने प्रत्यक्ष प्रशिक्षण ऑफिसर ट्रेनिंग ॲकॅडमी , नागपूरमध्ये सुरु होते. अत्यंत खडतर असे प्रशिक्षण. तसेच अत्याधुनिक शस्त्र हाताळणी व प्रत्यक्ष फायर सराव , परेड, शारिरीक कसरत, मॅप रिडिंग, योगा, सायबर क्राईम प्रशिक्षण, मैदानी खेळ व स्पर्धा घेतल्या गेल्या. विविध तज्ञांचे मार्गदर्शन, कुशल प्रशिक्षक, तज्ञ शिक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन दिले.
अशा या 179 बॅचमध्ये दोन महिन्याच्या ट्रेनिंग दरम्यान एएनओ ऑफिसर च्या ट्रेनिंगसाठी संपुर्ण देशभरातून 23 राज्यातील एकूण 525 कॅडेट प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची निवड दिल्ली डायरेक्टर जनरल ,नेशनल कैडेट कार्प यांच्यावतीने झाली होती. यात संपुर्ण देशातून शारिरीक कसरतीत महाराष्ट्रातील सागर मानसिंग आटोळे या ऑफिसर ला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ब्रिगेडियर निरंजन सुभाष जोग, सेना पदक (डेप्युटी कमांडट आणि चीफ इंस्ट्रक्टर नॅशनल कॅडेट कॉर्प्स, ऑफिसर्स ट्रेनिंग) यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे या प्रशिक्षण दरम्यान 50 दिवसात 23 किलो वजन कमी करुन आजपर्यंतचा सर्वाधिक वजन कमी करणारा या ॲकॅडमीचा पहिला अधिकारी म्हणून सागर आटोळे या अधिकाऱ्यांने या ऑफिसर ट्रेनिंग ॲकॅडमीमध्ये आजपर्यंतच्या इतिहासात शारिरीक कसरतीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करुन विक्रम रचला आहे. सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे बारामती तालुक्याचे नाव फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशभरामध्ये उंचावले आहे.