५६ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा महाराष्ट्राच्या महिला संघाची विजयी सलामी

फलटण टुडे वृत्तसेवा (दिल्ली ) :-
 २८ मार्च, भारतीय खो-खो महासंघाच्या वतीने दिल्ली येथे होणाऱ्या ५६ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचा थरारा गुरूवारपासून सुरू झाला आहे. महाराष्ट्राचे दोन्ही संघ अव्वल कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हि स्पर्धा करमाळी सिंग क्रीडांगण, बसंत लेन, रेल्वे कॉलनी, पहारगंज येथे १ एप्रिलपर्यंत रंगणार आहे. 
महाराष्ट्राच्या महिला संघाने आसामचा एक डाव २६ गुणांनी (३६-१०) धुवा उडवत विजयी सलामी दिली. महाराष्ट्राकडून अश्विनी शिंदे (३.२० मि. संरक्षण व ८ गुण), अपेक्षा सुतार (२.५० मि. संरक्षण व २ गुण), रेश्मा राठोड (२.४० मि. संरक्षण व ४ गुण), संपदा मोरे (नाबाद २ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी चांगला खेळ केला. आसामकडून प्रिया (१.४०, १.२० मि. संरक्षण), निहारिका (२ गुण) यांनी चांगला खेळ केला. मात्र महाराष्ट्राच्या आक्रमक खेळापूढे आसामचा संघ टिकाव धरू शकला नाही. दरम्यान, पुरूष गटात त्रिपूरा संघ उपस्थित नसल्यामुळे महाराष्ट्र संघाला पुढे चाल देण्यात आली आहे.
या स्पर्धेची गटवारी पुढील प्रमाणे 
पुरूष अ गट: रेल्वे, पाॅडेचेरी, पंजाब, इंडो-तिबेटीअन बाॅर्डर पोलीस, एसएसबी. 
ब गट: महाराष्ट्रासह तामिळनाडू, त्रिपूरा, मणिपूर, आसाम. 
क गट: कोल्हापूर, दिल्ली, हरयाणा, दादरा-नगर हवेली, सिक्कीम. 
ड गट: कर्नाटक, मध्यभारत, झारखंड, उत्तराखंड, महा पोलीस. 
इ गट: ओडीसा, विदर्भ, हिमाचलप्रदेश, लडाख. 
फ गट: आंध्रप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, जम्मु-काश्मिर. 
ग गट: वेस्टबंगाल, गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार. 
ह गट: केरळ, तेलंगणा, गोवा, चंदिगड यांचा समावेश आहे. 
महिलांमध्ये अ गट: महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, इंडो-तिबेटीअन बाॅर्डर पोलीस आणि आसाम यांचा समावेश आहे. 
ब गट : एअरपोर्ट, राजस्थान, तेलंगणा, एसएसबी, सिक्कीम. 
क गट: दिल्ली, आंध्रप्रदेश, झारखंड, दादरा-नगर हवेली, त्रिपूरा. 
ड गट: ओडिसा, पंजाब, पाँडेचेरी, जम्मू-काश्मिर, महा पोलीस. 
इ गट: गुजरात, तामिळनाडू, मध्यप्रदेश, गोवा, लडाख. 
फ गट: केरळ, विदर्भ, हिमाचल प्रदेश, मणिपूर. 
ग गट: कर्नाटक, कोल्हापूर, उत्तराखंड, बिहार. 
ह गट: हरयाणा, वेस्टबंगाल, छत्तीसगड, चंदिगड. 
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अनूभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या महाराष्ट्रचे दोन्ही संघ अव्वल कामगिरीसाठी सज्ज आहेत, असा विश्वास भारतीय महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!