फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण ) :-
राज्य परिवहन फलटण आगार आणि शिवदत्त आय क्लिनिक फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण आगारातील चालक – वाहक ,कार्यशाळा कर्मचारी यांच्याकरिता नेत्र तपासणी शिबिर श्री दत्त मंदिर येथे आयोजित करण्यात आले होते . शिवदत्त आय क्लिनिकचे डॉक्टर अनिल कुमार माने व त्यांचे सहकारी यांनी चालक वाहक कर्मचारी यांचि मोफत नेत्र तपासणी केली व आवश्यकतेनुसार मोफत आय ड्रॉप चे वितरण करण्यात आले .या तपासणी शिबिराचा फलटण आगारातील शंभर कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. या शिबिरात आपल्या डोळ्यांची निगा राखण्याबद्दल डॉक्टर माने यांनी कर्मचारी बंधूंना मार्गदर्शन केले. नेत्र तपासणी शिबिर आयोजनाबद्दल कर्मचारी बंधू-भगिनी यांनी धन्यवाद व्यक्त केले. यावेळी स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे वाहतूक निरीक्षक सुहास कोरडे, वाहतूक निरीक्षक रवींद्र सूर्यवंशी सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज आहिवळे उपस्थित होते.