फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे होते व रयतेचे कल्याणकारी राजे व सर्वात कमी वयात राज्याचा कारभार पाहणारे कर्तृत्ववान राजे होते त्यामुळे त्यांचा इतिहास कोणीही पुसू शकत नाही पृथ्वीवर चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचा इतिहास व विचार जिवंत राहणार असल्याचे प्रतिपादन इतिहास लेखक पांडुरंग बलकवडे यांनी प्रतिपादन केले.
शिवजयंती उत्सव समिती बारामती यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोडी लिपी प्रशिक्षण ,चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा ,शस्त्र प्रदर्शन, व बारामती शहरात गेल्या ४० वर्षी पासून शिव जयंती साजरे करणारे शिलेदार यांचा सत्कार आणि पांडुरंग बलकवडे यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी बलकवडे यांनी प्रतिपादन केले.
या प्रसंगी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे व संभाजी माने हेमंत नवसारे, संदीप मोहिते, सागर खलाटे, पृथ्वीराज चव्हाण, राहुल शेडगे, गणेश काळे, कुमार चव्हाण, सुदर्शन निचळ ,सुरज शेळके ,मनोज तोडे, किरण काकडे, प्रशांत कदम आदी मान्यवर उपस्तीत होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार डोक्यावर घेऊन नाचायचे नाही तर डोक्यात घेऊन सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून सर्वत्र पसरावेत असेही पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले.
डीजे मुक्त शिवजयंती मिरवणूक साजरी करणे व विद्यार्थ्यांना बालकांना येणाऱ्या काळामध्ये शिवरायांचा इतिहास समजावा,गड किल्ले संवर्धन करता यावे या साठी कार्यक्रम घेतल्याचे प्रास्ताविक मध्ये सुनील शिंदे यांनी सांगितले.
चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा मधील विजेत्यांचा सन्मान व मोडी लिपी प्रशिक्षक ऍड ओंकार चावरे यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
बारामती शहरात शांतता बद्ध शिवजयंती साजरी करून सर्व धर्म सर्व जाती मधील युवकांना सोबत घेऊन ४० वर्षांपासून शिवजयंती साजरी करणाऱ्या शिलेदारांचा सन्मान करण्यात आला.