फलटण पुढे वृत्तसेवा (बारामती ): –
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार मेघराज संतोष माने यांची बारामती शहर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली .
यावेळी राष्ट्रवादी युवक कोंग्रसचे प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण शहर अध्यक्ष जयदादा पाटिल तालुका अध्यक्ष संभाजीनाना होळकर बारामती बँकेचे अध्यक्ष सचिनशेठ सातव प्रदेश युवक सरचिटणीस अनिकेत पवार ,सोशल मिडिया पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल कावळे,सोशल मिडिया बारामती शहर अध्यक्ष तुषार लोखंडे,शहर युवक अध्यक्ष अविनाश बांदल ,तालुका युवक अध्यक्ष राहुल वाबळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळवून देणे , शासनाच्या शैक्षणिक धोरणाबाबत अवगत करणे आणि विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये समन्वय साधून विद्यार्थ्यांचा उत्कर्ष करणे व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन मेघराज माने यांनी निवडीनंतर सांगितले.