फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
आरोग्याविषयी आजकाल सर्वच जण जागरूक आहेत. आरोग्य, व्यायाम, आहार याबद्दल माहिती देणारे अनेक लेख आपल्याला वाचायला मिळतात. स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण नियमित व्यायाम करत आहेत. चरबी कमी होणे, स्नायू ची बळकटी वाढवणे, श्वसन तग धरण्याची क्षमता असणे ही व्यायामाची सकारात्मक लक्षणे आहेत. पण हे लक्षणे असणेच म्हणजे आपण शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे फिट आहोत का? आपण नियमित चालतो, पाळतो, व्यायामशाळेत जातो, योगासने करतो पण आपण फिट आहोत का? याचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला बघावे लागते शरीराच्या फिटनेस चे पंचांग हे पंचांग जीवनात खूप महत्वाचे आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध आहार तज्ञ अभिषेक ढवान यांनी केले आहे.
“तरुण पिढी ,व्यायाम व चाळीशी नंतरचे जीवन ” या विषयावर अभिषेक ढवाण यांनी हॅपी स्ट्रीट येथे मार्गदर्शन केले .
या प्रसंगी बारामती मधील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध जिम मधील युवक,युवती व डॉक्टर, नागरिक , उपस्तीत होते.
आपल्या शरीराचे आरोग्य सांगणारे पंचांग आहे. हे पाच अंग मिळून आपण शारीरिक दृष्ट्या किती बळकट आहोत हे ठरते. हे पाच अंग आहेत (स्टॅमिना) हृदय व फुफुसांची तग धरण्याची क्षमता, (पॉवर) स्नायूंची शक्ती, (फ्लेक्सिबिलिटी) शरीराची लवचिकता, (एन्ड्युरन्स) शारीरिक सहनशक्ती आणि (बॉडी कॉम्पोसिशन) शरीर रचना. आता हे पाच घटक काय आहेत आणि ते कशामुळे संतुलित राहतात हे पाहुयात.
1. हृदय व फुफुसांची तग धरण्याची क्षमता म्हणजेच ज्याला आपण कार्डिओरेस्पिरेटरी स्टॅमिना म्हणतो. कार्डिओरेस्पिरेटरी स्टॅमिना म्हणजे सतत जास्त वेळ चालू असलेल्या शारीरिक हालचाली (जसे कि खूप वेळ धावणे) दरम्यान कार्यरत स्नायूंना न थकता ऑक्सिजन व रक्त पोहोचवण्याची हृदय आणि फुफ्फुसाची क्षमता. हि आपली क्षमता कार्डिओ व्यायाम जसे की धावणे, ब्रिस्क वॉक, झुम्बा याने वाढते.
2. स्नायुशक्तीचा अर्थ कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात व सतत शक्ती निर्माण करणे, जसे की बॉक्सिंग चा बुक्का किंवा उंच उडी मारणे.
3. (एन्ड्युरन्स) शारीरिक किंवा स्नायूंची सहनशक्ती म्हणजे दिलेल्या प्रतिकाराविरुद्ध सतत संकुचित होण्याची विशिष्ट स्नायू गटाची क्षमता. प्लॅन्क करणे किंवा सायकलस्वार एखादा उंच चढ चढण्यासाठी सतत पेडल मारणे हे स्नायूंची सहनशक्ती उदाहरण आहे
4. लवचिकता हा शब्द आपल्यासाठी काही नवीन नाही. लवचिकता म्हणजे सांधे / स्नायू किंवा सांध्यांच्या मालिकेची अनिर्बंध, वेदनामुक्त हालचालींमधून हालचाल करण्याची क्षमता. योग मधले विविध मुद्रा हे लवचिकता दर्शवतात.
5. बॉडी कॉम्पोसिशन किंवा शरीर रचना म्हणजे मानवी शरीरातील चरबी, हाडे, पाणी आणि स्नायूंच्या टक्केवारी, आपल्या शरीर मध्ये या प्रत्येकाची टक्केवारी किती असावी याची मर्यादा ठरलेल्या आहेत.
हे पाच हि घटक किंवा हे पंचांग संतुलित ठेवण्या साठी काय करावे:
सगळ्यात महत्वाची चूक जे आपण सर्वजण बऱ्याचदा करतो ती म्हणजे एकाच प्रकारचा व्यायाम नेहमी करत राहणे. उदा. काही लोक रोज पाळतात. याने कार्डिओरेस्पिरेटरी स्टॅमिना वाढेल पण लवचिकता, शरीराचा वरच्या भागाचे स्नायू आणि संयुंची ताकत, काही स्नायूंची सहनशक्ती वाढणार नाही. यामुळेच आपण सगळ्याप्रकारचा व्यायामाचे मिश्रणकारावे जसे कि एक दिवस पाळणे, एक दिवस वजन उचलणे, योगा करणे, इत्यादी.
शरीर रचणे वर लक्ष ठेवणेः व्यायाम करून आपली चरबी कमी होती आहे किंवा वजन संतुलित राहत आहे याच बरोबर शरीरात बाकीचा घटकांची जसे अवयवांचा पोकळीतील चरबी म्हणजे विसरल फॅट, स्नायू आणि हाडे यांची टाके वारी मयदि मध्ये आहे का हे पाहावे. काही वेळा सतत कार्डिओ व्यायाम किंवा इतर चुकीचा व्यायाम केल्याने स्नायू कमी होणे, हाडांची घनता कमी होऊ शकते.