स्नेहल येणारे, कु.निकिता बाबर व प्रभात ढोक
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापुर, लातूर, नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे यांच्या आस्थापनेवरील कृषीसेवक पदाच्या परीक्षा राज्य शासनाचया वतीने घेण्यात आल्या होत्या . त्या परीक्षामध्ये विद्या प्रतिष्ठानचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, बारामती येथील विद्यार्थी कु. स्नेहल आप्पासाहेब येनारे कृषी सहाय्यक म्हणून कोल्हापूर विभाग निवड, व कु. निकिता प्रमोद बाबर कृषी सहाय्यक म्हणून कोकण विभाग ठाणे, २०१५-१९ बॅच, व कु. प्रभात ढोक कृषी सहाय्यक म्हणून कोल्हापूर विभाग २०२०-२३ बॅच च्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठानच्या मॅनेजमेंट कमिटी व महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. सुमन देवरुमठ, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन केले