पुढील पिढी साठी वनांचे करा संरक्षण : वनरक्षक बाळासाहेब गोलांडे

जागतिक वन दिन साजरा करताना विध्यार्थी,शिक्षक व बाळासाहेब गोलांडे आणि इतर

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :-
प्रत्येक विभागातील वनांचे आणि वन्यजीवांचे योग्य संरक्षण केले तरच पुढील पिढी संरक्षित होईल असे प्रतिपादन बारामती वनपरिक्षेत्र चे वनरक्षक बाळासाहेब गोलांडे यांनी केले जागतिक वन दिवस यानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना बाळासाहेब गोलांडे बोलत होते
वणवे लागू नये म्हणून काळजी कशी घ्यावी , वन्य प्राण्यांसाठी पाणवठे कसे तयार करायचे , औषधी वनस्पती ची लागवड करा जास्त सावली देणारे व पाणी साठवणूक करणाऱ्या झाडाची निगा राखणे व प्रत्येक वन्य प्राण्याबाबत माहिती देऊन शिकार करु नये आदी बाबत मार्गदर्शन व वनीकरण विभागातील पाण्याचे तळे, राफलिंग,मचाण, आदी विभागात फेरफटका मारून कण्हेरी येथील जिल्हा परिषद शाळा मधील विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून वन विभागात जागतिक वन्य दिन गुरुवार २१ मार्च रोजी साजरा करण्यात आला .
 बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी सौ शुभांगी लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या प्रसंगी वनरक्षक बाळासाहेब गोलांडे,
 जिल्हा परिषद शाळा कण्हेरी चे मुख्याध्यापक महेश देवकाते, वनसेवक अनिल काळंगे उमेश केसकर गणेश कोरे हरिभाऊ मासाळ इत्यादी उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांचे वन्य प्राणी आणि वन्य वनस्पती याविषयी प्रश्नांना उत्तरे वनरक्षक बाळासाहेब गोलांडे यांनी दिले .
विद्यार्थ्यांच्या हस्ते जागतिक वन्य दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!