फलटण टुडे (बारामती ) :-
जिद्द चिकाटी आत्मविश्वास या जोरावर उद्योजक यश मिळवतात व त्यांचे उत्पादन आंतरराष्ट्रीय स्तरावर जाते हे बारामतीचे एमआयडीसी चे वैभव असल्याचे मत बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन चे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी सांगितले.
बारामती एमआयडीसी मधील
व्ही आर बॉयलर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे एकोनामायझर कॉइल इंडोनेशिया या देशामध्ये पाठवण्यात आले या मटेरियलच्या प्रथम पूजन व कंटेनरला हिरवा झेंडा दाखविण्या चा कार्यक्रम प्रसंगी धनंजय जामदार बोलत होते या प्रसंगी
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे मनोहर गावडे, अनंत अवचट ,महादेव गायकवाड, हरिश्चंद्र खाडे ,हरीश कुंभारकर, सूर्यकांत रेड्डी, संजय थोरात,गौरव फाळके व बारामती चेंबर्स ऑफ कॉमर्स चे उपाध्यक्ष पंढरीनाथ कांबळे , मराठा सेक्युरिटी इंटेलिजन्स चे प्रवीण जगताप व प्रणव सातपुते आदी मान्यवर उपस्तीत होते.
गुणवत्ता व दर्जा देत असताना विक्री पश्चात ग्राहकांना उत्तम सेवा व्ही आर बॉयलर च्या माध्यमातून मिळत असल्याने स्थानिक ग्राहक बरोबर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहक जोडले जात असल्याने बारामतीच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला जात आहे असे धनंजय जामदार यांनी सांगितले.
ग्राहकांच्या मागणीनुसार बदलत करत व आंतरराष्ट्रीय नियमावलीचे पालन करत , उत्तम मटेरियल वापरून सदर उत्पादन बनवले असल्याची माहिती व्ही आर बॉयलर सोलूंशन चे चेअरमन राजाराम सातपुते यांनी सांगितले तर उपसितांचे स्वागत प्रणव सातपुते यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले व आभार प्रवीण जगताप यांनी केले.
———-