फलटण: श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत माढा लोकसभा मतदारसंघात मुंबईतील सागर बंगल्यावर बैठक झाली असून यासंदर्भात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपले स्टेटस ठेवून खुलासा केला असून सुद्धा विरोधी गटाकडून फेक स्वरूपाचा स्टेटस सोशल मीडिया वरती फिरवला जात असून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बद्दल गैरसमज कार्यकर्त्यांमध्ये निर्माण व्हावा या उद्देशाने सर्व प्रकारच्या सोशल मीडिया वरती फेक स्वरूपाचा स्टेटस समाज माध्यमांवरत फिरवला जात आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा फेक स्टेटस सोशल मीडिया वरती फिरवून त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार व माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माढा लोकसभा संदर्भात बैठकीत झाली यामध्ये महायुतीचा धर्म पाळावा अशी सूचना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना करण्यात आली परंतु मी माझे स्थानिक लेव्हलचे कार्यकर्त्यांशी व माढा लोकसभा मतदारसंघातील समविचारे नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी निर्णय देईल असे सांगितले.