रक्तदान शिबिर काळाची गरज- प्रा.शिवलाल गावडे

.

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण) : –
 रक्तदानाचे महत्व व गरज लक्षात घेऊन संगिनी फोरम,फलटण व फलटण एस.टी.आगार यांनी संयुक्त विद्यमाने फलटण ब्लड बँकेच्या सहकार्याने फलटण बस स्थानकावर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात प्रा.गावडेसर बोलत होते.
     रक्तदान हे श्रेष्ट दान असुन ,रक्तदानाने एका जीवाचे प्राण वाचु शकतात. सामाजीक बांधिलकी म्हणुन संगिनि फोरम व फलटण आगाराने रक्तदान शिबीर हा स्तुत्य ऊपक्रम राबवल्याचे प्रा.शिवलाल गावडे सर यांनी प्रतिपादन केले.
        रक्तदान शिबिरास फलटण आगारातील चालक-वाहक कर्मचारी-अधिकारी यांनी ऊस्फुर्त प्रतीसाद देऊन रक्तदान केले.

      यावेळी आगार व्यवस्थापक रोहित नाईक,संगिनि फोरम अध्यक्षां अपर्णा जैन,स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे,वाहतुक निरीक्षक सुहास कोरडे,वाहतुक निरीक्षक रविंद्र सुर्यवंशी,सहाय्यक वाहतुक निरीक्षक धिरज अहिवळे ,ब्लड बँकेचे अध्यक्ष डाँ.श्रीकांत करवा ,संचालक डाँ.रुषीकेश राजवैद्य ,संगिनि खजिनदार मनिषा घडिया,जैन सोशल ग्रुपचे ऊपाध्यक्ष श्रीपाल जैन,माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी,माऊली कदम ,संगीनि फोरम माजी अध्यक्षां निना कोठारी,सदस्या ममता शहा,नेहा दोशी तसेच बहुसंख्य एस.टी.कर्मचारी बंधु-भगीणी ऊपस्थीत होते.

      रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपञ व भेट वस्तु देण्यात आल्या .संगिनी सदस्या ममता शहा यांनी रक्तदानाचे महत्व,एस.टी.कर्मचारी बंधुचे समाजातील योगदान याविषयी मनोगत व्याक्त केले.
      संगिनि फोरम कडुन सर्व रक्तदाते व ब्लड बँक कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!