चौकट:
साळवे नगर येथील उर्वरित सदनिका चे बांधकाम आचार संहिता झाल्यावर लगेच सुरू करण्यात येईल व सोलापूर नंतर बारामती मधील ‘आदर्श वन बीच के’ सदनिका असून राज्यात या प्रमाणे सदनिका यापुढे झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र साठी करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
चंद्र, सूर्य असे पर्यंत संविधान बदलणार नाही: अजित पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत मधील सदनिकेचे लोकार्पण
डॉ आंबेडकर वसाहत येथील रहिवाशांना सदनिकेच्या चाव्या देत असताना अजित पवार सोबत सुनेत्रा पवार , बिरजू मांढरे, किरण गुजर व इतर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :-
या देशांमध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान कदापिही कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलले जाणार नाही असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
गुरुवार दि.१४ रोजी
बारामती नगर परिषद व महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यामानाने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहात मधील १०६ सदनिकेचा लोकपर्ण सोहळा अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी अजित पवार उपस्तीतांना मार्गदर्शन करत होते.
या प्रसंगी टेक्सटाईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार व
आयोजक स्थानिक नगरसेवक व मा. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे,मा. नगरसेवक किरण गुजर,मयुरी शिंदे, अनिता जगताप, नवनाथ बल्लाळ, अभिजित चव्हाण व शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष जय पाटील व मा. उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव आणि महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे तांत्रिक संचालक अनिल कानीटकर, प्रशासन संचालक प्रवीण कोळी ,नगरपरिषद चे मुख्यधिकारी महेश रोकडे व इतर मान्यवर उपस्तीत होते.
संविधान बदलले जाणार असा अपप्रचार विरोधक मुदाम करत आहे त्यापासून सावध राहण्याचचे आव्हान केले व भावनिक होऊ नका तसेच डॉ आंबेडकर वसाहत चे सोंदर्य वाढले आहे त्यामुळे स्वछता राखा, व्यसने करू नका आणि गोर गरीबाच्या स्वप्नातील घरे पूर्ण होत असल्याबद्दल सर्वात जास्त समाधान होत व या पुढेही आमराई मधील जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कार्य करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
डॉ आंबेडकर वसाहत मध्ये गोर गरिबांचे हक्काचे अत्याधुनिक स्वतःचे घर पूर्ण करून त्यामध्ये राहण्याचा हक्क फक्त अजित दादांनी दिला आहे. त्यामुळे आजचा हा एतेहसिक दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल शासकीय योजना गोर गरीब जनतेसाठी तळागाळात आणण्याचे श्रेय फक्त अजित दादांना जाते जनता हे उपकार विसरणार नसल्याचे आयोजक नगरसेवक बिरजू मांढरे यांनी सांगितले.
अजित पवार यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत च्या इमारतीचे स्मृती चिन्ह देऊन कृतन्यता व्यक्त करण्यात आली.
प्राथमिक स्वरूपात पाच रहिवाशांना सदनिकाच्या चाव्या अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आल्या.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले.