रोटरी क्लब ऑफ बारामती तर्फे जागतिक महिला दिन साजरा

सुप्रिया सुळे यांना पुरस्कार प्रदान करताना रोटरी क्लब ऑफ बारामती चे पदाधिकारी

फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती ): –
रोटरी क्लब ऑफ बारामतीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त पर्यावरण बदलात महिलांचा सहभाग या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. 
सदर चर्चा सत्रासाठी खासदार सौ सुप्रिया सुळे यांना आमंत्रित करण्यात आले होते, त्यांच्यासोबत रोटरीच्या डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या प्रांतपाल मंजू फडके यादेखील उपस्थित होत्या.
 सहप्रायोजक म्हणून रोटरी क्लब ऑफ दौंड,रोटरी क्लब ऑफ भिगवन,रोटरी क्लब ऑफ इंदापूर, रोटरी क्लब ऑफ सराटी डिलाईट, रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एमआयडीसी या क्लब चे अध्यक्ष व मेंबर उपस्तीत होते.
सुप्रिया सुळे यांना रोटरी व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, त्याप्रसंगी वोकेशनल चे डायरेक्टर वसंतराव माळुंजकर व झोनल डायरेक्टर प्रा. अजय दरेकर उपस्थित होते,
 पर्यावरणात बदल करण्यासाठी आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे असे मत नमूद केले, तसेच प्लास्टिक रिसायकलिंग होण्यासाठी व समाजातील प्लास्टिकचा वापर कमी करण्यास प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले सुप्रिया सुळे यांनी सांगितले
गरजू महिलांना ऑटोमॅटिक शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले, रोटरीतर्फे महिला दिनानिमित्त महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता असे अनेक उपक्रम रोटरी क्लब ऑफ बारामती मार्फत राबविण्यात येत असतात, त्याचा फायदा गरजुनी घ्यावा असे अध्यक्षा सौ.दर्शना गुजर यांनी केले सांगितले 
 हवामान बदल कमी करण्यात महिलांचा सहभाग या विषयावरती एक चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले होते, या चर्चासत्रात पर्यावरण तज्ञांना आमंत्रित करण्यात आले होते त्यामध्ये रो.राजेंद्र कुमार सराफ, डॉ. प्रियदर्शनी कर्वे, सुजाता कोडग, सोनाली शिंदे यांचा समावेश आहे, त्यांनी पर्यावरणावरती होणारा बदल व त्यामध्ये महिलांचा सहभाग या विषयावरती त्यांचे मत व्यक्त केले, 
प्राध्यापक हनमंतराव पाटील , डॉ. नीता दोशी, श्री. वसंतराव मालुंजकर यांनी पॅनल डिस्कशन मध्ये सहभाग घेतला,
पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला,
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ बारामतीचे सचिव अभिजीत बर्गे यांनी केले, रोटरी क्लब बारामतीचे अक्षय महाडिक, कौशल शहा, अरविंद गरगटे, अतुल गांधी, किशोर मेहता, निखिल मुथा, मल्लिकार्जुन हिरेमठ, हर्षवर्धन पाटील,प्रफुल गादिया, प्रीती पाटील, उज्वला मेहता, जयश्री पाटील उपस्थित होते.
श्रद्धा महाडिक यांनी सूत्रसंचालन केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!