फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :-
ऑल इंडिया लीनेस क्लब, मल्टिपल चतुर्भुजा दिव्यध्वनी, एम एच -2 बारामती यांचे वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शासकीय महिला ग्रामीण रुग्णालय बारामती येथील 42 मातांना साडी चोळी, फळे व नवजात बालकांना कपडे देऊन साजरा करण्यात आला.(12मार्च रोजी).
याप्रसंगी अध्यक्ष उल्का जाचक तसेच उज्वला शिंदे, सीमा चव्हाण, सुवर्णा मोरे, साधना जाचक, स्वाती ढवाण, विजया कदम, मनीषा खेडेकर, लता ओसवाल, जयंती सावंत, सपना चांदगुडे, राधिका जाचक, उज्वला खोमणे, सुनीता तावरे,पुनम जाधव, संगीता जाचक, हर्षदा शिंदे, निशिगंधा जाचक या लीनेस सदस्य उपस्थित होत्या .
बारामतीच्या या शासकीय रुग्णालयात फक्त बारामती परिसरतीलच नाहीतर जामखेड, नगर, कर्जत,सासवड, फलटण अशा भागातील गरजू महिला प्रसूतीसाठी दाखल होत असतात
ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरजू महिलांना गुणवत्तापूर्ण,अद्यावत, आरोग्य सेवा मिळत असल्याबद्दल लिनेस क्लबच्या सर्व सभासदांनी समाधान व्यक्त केले. दररोज ५० पेक्षा जास्त प्रसूती होत असून बारामती मध्ये असे रुग्णालय आहे याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो अशी सर्वांची प्रतिक्रिया होती.
रुग्णालय प्रमुख डॉ. बापू भोई यांनी कार्यक्रमास परवानगी देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांचे तसेच डॉ. सातपुते मॅडम आणि इतर स्टाफ चे निशिगंधा जाचक यांनी आभार मानले.
…….………………………………….