फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण ) :-
12 मार्च 2024 रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर फलटण येथे यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यावेळी प्रशालेच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीची बैठकही संपन्न झाली.
वरील सभेस प्रशालेतील अंतर्गत तक्रार निवारण समिती तसेच मा.सौ.वैभवी भोसले मॅडम निर्भया पथक प्रमुख त्यांच्या सहकारी मा.सौ.कुदळे मॅडम या उपस्थित होत्या व त्यांनी महिला सक्षमीकरण आणि मोबाईलच्या अतिवापराचे तोटे अशा विविध मुद्द्यांवरती मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनींनाही याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी सोप्या शब्दात मार्गदर्शन केले.
त्यावेळी प्रशालेच्या शाळा समिती शाळा समितीच्या चेअरमन मा.सौ.वसुंधरा नाईक निंबाळकर,व्हाईस चेअरमन मा.सौ.नूतन शिंदे, निमंत्रित सदस्या श्रीमती निर्मला रणवरे व प्रशालेचे मा.मुख्याध्यापक श्री.रुपेश शिंदे व व संपूर्ण अंतर्गत तक्रार निवारण समिती उपस्थित होती आवाहन करण्यात आले की सर्व पालकांमध्ये मोबाईलच्या अतिवापराचे तोटे याबाबत जनजागृती करावी व कोणत्या पद्धतीने मार्गदर्शन करावे हेही सांगण्यात आले. अशाप्रकारे अंतर्गत तक्रार निवारण समितीची बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.