उद्योजक व्यापारी व उद्योगमंत्री संवाद संपन्न
उद्योजक व व्यापारी यांना मार्गदर्शन करताना उदय सामंत व व्यासपीठावर अध्यक्ष ललित गांधी , शरद सूर्यवंशी व अन्य मान्यवर
(छायाचित्र: प्रशांत कुचेकर)
फलटण टुडे (बारामती प्रतिनिधी ) :-
बारामतीमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय कार्यालय सुरू झाले या कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक व्यापारी उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल व उद्योगांना चालना मिळेल. इंद्रायणी, पवना नदी प्रदूषण मुक्त करणार, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी रेड कार्पेट केले असून गर्जे मराठी या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला असून तो खूप महत्त्वाचा आहे. तसेच बारामतीकरांना एमआयडीसी चे विभागीय कार्यालय मंजूर करण्यात आले आहे व कामगारांच्या ईएसआईसी हॉस्पिटलसाठी आठ एकर जागा मंजूर केली असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र चेंबरच्या बारामती विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड अँग्रीकल्चरच्या बारामती विभागीय कार्यालयाचे उद्घाटन, उद्योग व व्यापार परिषदेचे उद्घाटन, विभागीय कार्यकारिणी पदग्रहण समारंभ उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते व उपस्थित संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते. उपाध्यक्ष रवींद्र मानगावे उपाध्यक्ष एस. डी. परब, बारामती विभागाचे विभागीय चेअरमन शरद सूर्यवंशी, व्हाईस चेअरमन शिवाजी निंबाळकर, सुशीलकुमार सोमानी,ऍड गांधी, महावितरण कंपनी बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे एमआयडीसी पुणे झोनचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, भारत फोर्स लिमिटेड बारामतीचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय अग्रवाल, वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष धीरज केसरकर सरकार्यवाह सुरेश घोरपडे उपस्थित होते.
महाराष्ट्र चेंबरचे बारामती विभागीय अध्यक्ष शरद सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
याप्रसंगी उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार माणिकराव येळे ,जयंत इंगोले, सुरेश परकाळे अप्पासाहेब शिंदे, आर ए मुलाणी उद्योग मित्र पुरस्कार सुनील पावडे, मुख्य अभियंता महावितरण नितीन वानखेडे मुख्य अभियंता एमआयडीसी ,भारत फोर्ज चे संजय अग्रवाल, धीरज केसरकर, नीलेश मोढवे, विजय पेठकर, विलास आडके, हनुमंतराव पाटील यांचा सत्कार उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला तर
महिला दिनाचे औचित्य साधून उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिला
उद्योजक सौ जयश्री जाधव, सौ संगीता मसवडे, सौ सुप्रिया बोबडे, सौ मेघा भोईटे, सौ आरती खराडे, सुप्रिया बर्गे, राधिका दराडे,
यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास महाराष्ट्र चेंबरचे कार्यकारणी सदस्य रणजीतसिंग आनंद, संजय आराणके,रमेश आरवडे, सर्जेराव नलावडे, अँड. केशव कोरगावकर, केतन शहा, निलेश घरत, प्रवीण घरत आदिंसह व्यापारी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रफुल्ल तावरे, किशोर शहा, मनोज तुपे, राहुल शहा यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले.